मुंबई ः प्रतिनिधी
कोरोना रुग्णवाढ न थांबल्यास राज्यातील काही शहरांमध्ये लॉकडाऊन केला जाऊ शकतो, अशी शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. लॉकडाऊन टाळायचा असेल तर नियम पाळावेच लागतील, असा इशाराही आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे.
राज्यात रोज कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला जात आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी (दि. 23) पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा राज्यात रोज विक्रमी आकडा समोर येत आहे. यात विशेषकरून मुंबई, पुणे, नागपूरची आकडेवारी चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात आज दोन लाख 10 हजार सक्रिय रुग्ण असून 85 टक्के लक्षणविरहित आहेत, तर कोरोनामुळे होणारा मृत्यूदर 0.4 टक्के इतका आहे, अशी माहिती त्यांनी या वेळी दिली.
Check Also
पनवेलमधील बेघर निवारा प्रकल्पाची महापालिका सदस्यांकडून पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या वतीने सेक्टर १२, प्लॉट क्रमांक २ए येथे उभारण्यात येत असलेल्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper