Breaking News

माणगावच्या फरारी पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

माणगाव : प्रतिनिधी

लाचखोरी करून फरारी झालेले माणगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गणेश जनार्दन कांदेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदेकर यांनी लाच स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक पकडण्यासाठी आल्यानंतर हवालदाराच्या अंगावर बुलेट गाडी घालून पलायन केले होते. एका गैर अर्जदारावर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रारदाराकडे 50 हजार रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडीअंती 25 हजार रुपये स्वीकारणारे माणगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गणेश कांदेकर (54) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडण्याचा प्रयत्न केला असता, सापळ्याची चाहूल लागल्याने ते त्यांच्या ताब्यातील बुलेट गाडीने तीनबत्ती नाका येथे आले. तेथे पथकातील पोलीस हवालदार मोरे यांनी ओळख सांगून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र कांदेकर यांनी त्यांच्या ताब्यातील पिस्तुलाला हात घालण्याचा प्रयत्न करून व बुलेट गाडीने ठोकर मारून मोरे यांना गंभीर स्वरूपाची दुखापत केली आणि लाचेची रक्कम घेऊन महाड बाजूकडे राष्ट्रीय महामार्गाने भरधाव वेगात बुलेट गाडीने फरार झाले. कांदेकर यांच्यावर रात्री उशिरा माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा कसून शोध घेतला जात आहे.

Check Also

सुभाष घईंच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी

तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, …

Leave a Reply