Breaking News

राज्यपालांसोबत सामाजिक कार्यावर चर्चा

मुंबई : प्रतिनिधी

अगरवाल समाज पनवेल व अखिल भारतीय सर्व वैश्य एकता महासभा महाराष्ट्रद्ारा  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची गुरुवारी (दि. 1) भेट घेण्यात आली. या वेळी राज्यपालांना होळीच्या शुभेच्छा देऊन सामाजिक कार्यावर चर्चा करण्यात आली. या सदिच्छा भेटीवेळी अगरवाल समाज पनवेलचे अध्यक्ष तुषार अगरवाल, मंत्री अनिल बागरिया व कमलेश अगरवाल उपस्थित होते. त्याचबरोबर अखिल भारतीय सर्व वैश्य एकता महासभा महाराष्ट्रचे प्रदेश महामंत्री अमित अग्रवाल, अध्यक्ष पश्चिम मुंबई ललित अग्रवाल, पनवेल अध्यक्ष तुषार अग्रवाल, नवी मुंबई मंत्री राजेंद्र अग्रवाल उपस्थित होते.

Check Also

झालमुरी, एसडी, आरडी आणि सुरांची अवीट मैफल!

‌‘पुरवैय्या‌’ने पनवेलकरांना दिली अविस्मरणीय सांगीतिक पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्तपश्चिम बंगालने हिंदी चित्रपटसृष्टीला अनिल विश्वास, …

Leave a Reply