Breaking News

कोरोनाला रोखण्यासाठी केंद्राचा पंचसूत्री कार्यक्रम

नवी दिल्ली ः देशातील महाराष्ट्रासह काही राज्यांत पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतोय. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 4) वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोना लसीकरण अभियानाचा आढावा घेण्यात आला. कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकार्‍यांना पंचसूत्री कार्यक्रम समजावून सांगितला. टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रिटमेंट, कोरोना नियमांचे पालन आणि लसीकरण जर गंभीरपणे आणि कटिबद्धतेने केले गेले तर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. त्यासाठी अधिकार्‍यांनी जनजागृतीवर भर देण्याचे निर्देशही पंतप्रधान मोदींनी या वेळी दिले.

Check Also

पनवेलमधील बेघर निवारा प्रकल्पाची महापालिका सदस्यांकडून पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या वतीने सेक्टर १२, प्लॉट क्रमांक २ए येथे उभारण्यात येत असलेल्या …

Leave a Reply