Breaking News

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राचा पुरुष संघ जाहीर

मुंबई ः प्रतिनिधी

भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने आणि उत्तर प्रदेश राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने 13 ते 16 एप्रिल या कालावधीत अयोध्या येथे होणार्‍या 68व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राने आपला संघ जाहीर केला. 17 व 18 मार्च रोजी बारामती स्पोर्ट्स अकादमीच्या सौजन्याने घेण्यात आलेल्या मैदानी चाचणी स्पर्धेतून हा संघ निवडण्यात आला आहे.

या संघात मुंबई शहर, ठाणे, रत्नागिरी व नांदेडच्या प्रत्येकी दोन खेळाडूंचा समावेश आहे. गतवर्षी महाराष्ट्राची मजल उपांत्यपूर्व फेरीपर्यंतच सिमित राहिली होती. गतवर्षीचा संघ पूर्णपणे नवोदित व नव्या उमेदितील खेळाडूंचा होता.

संघाचे सराव शिबिर बारामती स्पोर्र्ट्स अकादमी येथे मॅटवर 27 मार्च पासून ते 8 एप्रिलपर्यंत सुरू होते.  12 एप्रिल रोजी दुपारी हा संघ मुंबई विमानतळावरून हवाईमार्गे स्पर्धेकरिता रवाना होईल.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply