Breaking News

एलईडीने मासेमारी करणार्या तीन बोटी ताब्यात

मुरूडमध्ये 35 जणांवर कारवाई

मुरूड : प्रतिनिधी

येथील खोल समुद्रात एलईडी दिव्यांचा वापर करून पर्ससीन नेटच्या सहाय्याने मासेमारी करणार्‍या तीन बोटी गुरुवारी (दि. 8) रात्री ताब्यात घेऊन मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकार्‍यांनी या बोटींचे मालक व तांडेल यांच्यासह 35 जणांवर कारवाई केली आली.

मुरुडपासून 35 किमी अंतरावर खोल समुद्रात एलईडीने मासेमारी सुरू असल्याची खबर मिळताच  मत्स्यविभागाच्या अधिकारी व पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्या वेळी तेथे जय भैरी (आयएनडी-एमएच-4,एमएम-1180) ही एलईडी नौका, धनदैलत (आयएनडी-एमएच-4,एमएम-1024) ही पर्ससीन नेट नौका आणि धनलक्ष्मी (आयएनडी-एमएच-4,एमएम-1481) ही नौका एलईडी दिव्यांचा वापर करून पर्ससीन नेटच्या सहाय्याने मासेमारी करीत असताना आढळल्या. त्यांच्यासह एलईडी दिवे, जनरेटर, बॅटरी, 300 किलो मच्छी ताब्यात घेण्यात आली. सकाळी त्यांना आगरदांडा बंदरात आणून तांडेल व मालकासह 35 जणांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम 1981अन्वये कारवाई करण्यात आली. 

मत्स्यविभागाचे प्रादेशीक उपायुक्त महेश देवरे,  सहाय्यक आयुक्त संजय वाटेगावंकर, अधिकारी संजय माने यांच्या मार्गदर्शनाखाली परवाना अधिकारी स्वप्निल दाभणे, तुषार वाळुंज, सुरक्षारक्षक केतन भगत, पोलीस  उपनिरीक्षक दत्तात्रेय भोसले, शिपाई ओमकार सोंडकर, दामोदर खटले, हवालदार योगेश हटकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

एलईडी मासेमारीमुळे छोटया मच्छीमारांना मासळीच सापडत नाही. सरकारने एलईडी मासेमारीवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल.

-महेंद्र गार्डी, चेअरमन,जयभवानी मच्छीमार सोसायटी, मुरूड

एलईडीच्या सहाय्याने खोल समुद्रात अनधिकृत मासेमारी करणार्‍या तीन बोटी आढळल्या असून, सर्व साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे. या बोटींचे मालक व तांडेलांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत म्हणून समुद्रात कडक गस्त घालण्यात येईल. 

-महेश देवरे, उपायुक्त, मत्स्यविभाग, मुंबई

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply