खालापूर ः प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील माजगाव येथे एका किराणा स्टोअर्सवर धाड टाकून सुमारे पाच लाख किमतीचा गुटखा खालापूर पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस उपायुक्त संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.
माजगाव गावाच्या नाक्यावर असणार्या माही किराणा स्टोअर्समध्ये शासनाने प्रतिबंध केलेला गुटखा, पान मसाला विक्रीसाठी आणला आहे, अशी खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार खालापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मेहबूब तांडेल, गायत्री जाधव त्यांची टीम माजगाव येथे रवाना झाली. पोलिसांनी प्रथम दोन पंचांना बोलून घेतले व दुकानात झडती घेतली. या दुकानात काहीही मिळाले नाही, मात्र मागील बाजूस असलेल्या गोडाऊनमध्ये किराणा सामनात सफेद रंगाच्या प्लास्टिकच्या गोण्या दिसून आल्या. त्यात शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला आढळून आला. याची एकूण किंमत पाच लाख 17 हजार 737 रुपये आहे. हा सर्व माल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी दुकानदार नरेश लक्ष्मण पाटील याच्याविरुद्ध खालापूर पोलीस ठाण्यात भा. द. वि. कलम 328, 272, 273सह अन्न नागरी सुरक्षा मानके अधिनियम 2006चे कलम 59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर अभियंता प्रकोष्ठ प्रदेश प्रभारीपदी
भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस …
RamPrahar – The Panvel Daily Paper