कळंबोली येथे पोलिसांची कारवाई
पनवेल : वार्ताहर – कोरोनाचा विषाणू कोविड 19चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून महाराष्ट्रात विविध ठिकाणी रोजंदारीवर काम करणार्या अनेक मजूर त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. शासनाकडून काही ट्रेनने मजुरांना त्यांच्या मूळगावी परत पाठवले असले तरी आजही हजारोंच्या संख्येने मजूर त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी प्रयत्नात आहेत. याच पार्श्वभूमीवर कळंबोली येथून 24 लोकांनी भरलेला टेम्पो उत्तर प्रदेश येथे रवाना होत असल्याची माहिती पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी जाऊन संबंधित व्यक्तींवर कारवाई केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळामध्ये संचारबंदीचे उल्लंघन करणार्यांवर कारवाईबाबत पोलीस आयुक्त संजय कुमार साहेब नवी मुंबई यांनी दिलेल्या आदेशास अनुसरुन गुन्हे शाखा कक्ष -2 यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीवरून सहपोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रवीण कुमार पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. आर. पोपेरे यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे ही कारवाई करण्यात आली%
या बाबत सविस्तर वृत्त असे की, नवी मुंबई परिमंडळ-2 हद्दीतील कळंबोली देवांशीइन हॉटेल याठिकाणी टाटा टेम्पो 1109 मधून विनापरवानावाहतूक करणार्या वाहन क्रमांक एमएच 04 एचडी 3778 आला असता त्याठिकाणी वाहनाची चौकशी केली. वाहनात एकूण 24 पुरुष प्रवाशी बसलेले असल्याने याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्यांच्याकडे अत्यावश्यक सेवेदरम्यान प्रवास करण्याबाबत कोणतेही ठोस कारण मिळून आले नाही. तसेच या वाहनातील चालक व इतर प्रवाशी यांनी उपाययोजना म्हणून कोणत्याही प्रकारचे मास्क लावले नव्हते. या व्यक्ती पनवेल परिसरातून उत्तर प्रदेश येथील प्रतापगड या गावाला अवैधपणे जात होते.
त्यामुळे ट्रक चालक हिमायु अली मोहम्मद इस्माईल(31)रा.मु.पो. आर-39, इंदिरा नगर, एसएम रोड अँटॉप हिल मुंबई सध्या रा. आसुडगाव इंटरनेट बारजवळ, रमेश चाळ पनवेल याच्या विरोधात कोरोना प्रादुर्भावाचे अनुषंगाने लोकांची सुरक्षितता धोक्यात आणून जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी रायगड यांचे कोरोना 2020आदेशाचा भंग केल्याबाबत कोविड-19या रोगाचा प्रसार पसरविण्याचे दृष्टीने घातक कृती केल्याबाबत त्यांच्या विरोधात भा. दं. वि. 188, 269, 270, 290, 336, साथीचेरोग अधिनियम1897 चेकलम3, मोटार वाहन अधिनियम1954 चे कलम66,192 कलमन्वये कारवाई करण्यात आली. सार्वजनिक आरोग्य विभाग अधिसूचनाक्रमांक कोरोना 2020/ सीआर.तसेच कोविड 19 उपाययोजना नियम 11 संदर्भात निर्गमित केलेल्या विविध शासन अधिसूचना व आदेशाचे उल्लंघन व वाहतूक परवान्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी कळंबोली पोलीस अधिक तपास करीत आहेत.