Breaking News

पोलादपूर एसटी स्थानक बनलेय डम्पर्ससह रिक्षेचेही वाहनतळ

पोलादपूर : प्रतिनिधी

प्रवासी वाहतूक बंद असल्यामुळे रिक्त असलेले राज्य मार्ग परिवहन महामंडळा (एसटी) चे पोलादपूर बस स्थानक सध्या एलऍण्डटीच्या डम्पर्ससह अन्य वाहने व रिक्षेचेही वाहनतळ बनले आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूर येथे एसटीच्या रायगड विभागातील शेवटचे बसस्थानक असून, महाड आगारांतर्गत या स्थानकाचा कारभार चालतो. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर गेल्या महिन्यापासून एसटीबसेसमधून प्रवासी वाहतूक बंद झाल्यामुळे पोलादपूर स्थानकाचे आवार संपूर्ण रिकामे असते. सध्या तेथे महामार्गाच्या चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या एलऍण्डटी कंपनीच्या कामावरील डम्पर्ससह रिक्षा तसेच अन्य वाहने उभी करून ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे एसटी बसेस वगळता अन्य वाहनांसाठीचे वाहनतळ असे या स्थानकाला स्वरूप प्राप्त झाले आहे.

एसटी महामंडळाच्या वाहतूक नियंत्रकांनी या परिस्थितीकडे डोळेझाक सुरू केल्याने रिक्षा स्टॅण्डमधील रिक्षा तसेच एलऍण्डटी कंपनीच्या कामावरील डम्पर्ससह अन्य वाहने पोलादपूर स्थानकामध्ये दिवसरात्र उभी केली जात आहेत.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply