अलिबाग : प्रतिनिधी
तौत्के चक्रीवादळात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अनेकांच्या डोक्यावरील छप्पर उडाले. अलिबाग तालुक्यातील वादळग्रस्तांना आता भाजपाने मदतीचा हात पुढे केला आहे. भाजपच्या माध्यमातून तालुक्यातील वादळग्रस्तांना छताच्या पत्र्यांचे वाटप करण्यात आले.
अलिबाग शहराबरोबरच लगतच्या वरसोली कोळीवाडा , रोहिदास नगर झोपडपट्टी येथील नागरिकांच्या घरावरील पत्रे वक्रीवादळात उडून गेले होते. त्यांना ही मदत देण्यात आली. या वेळी भाजपाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते, अलिबाग शहर अध्यक्ष अंकित बंगेरा, निलेश महाडीक, सतीश लेले, सुनील दामले, युवा मोर्चा सरचिटणीस निखील चव्हाण उपस्थित होते.
चक्रीवादळ शमताच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी एकत्रितपणे रायगड जिल्ह्यातील वादळग्रस्त भागाची पाहणी केली. या दौर्यादरम्यान वादळग्रस्तांना भाजपाकडून मदतीचा हात दिला जाईल, असे त्यांनी सांगितले होते. तशा सूचनाही पदाधिकार्यांना दिल्या होत्या. त्यानुसार आम्ही ही मदत पुरवल्याचे अॅड. महेश मोहिते यांनी सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper