पनवेल : वार्ताहर
स्माईल फाऊंडेशन व ब्लू लाईन फाऊंडेशन यांच्या माध्यमातून पनवेल तालूका पोलिसांनी आदिवासी वाड्या येथे जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. या वेळी पनवेल तालुका पोलीस स्टेशन हद्दीत फणसवाडी (भाताण, पो. आजिवली, ता. पनवेल) ही आदिवासी वाडी आहे. त्या आदिवासी वाडीमध्ये एकूण 45 आदिवासी कुटुंबे राहतात. सध्याचे कोरोना महामारीमध्ये तेथील आदिवासी लोकांना सध्या रोजगार नाही. त्यामुळे सदर आदिवासी वस्तीवरील एकूण 45 कुटुंबाना 15 दिवस पुरेल इतके तांदूळ, साखर, डाळ, तेल, कांदे व इतर किराणा असे साहित्यांचे वाटप करण्यात आले. स्माईल फाऊंडेशन व ब्लू लाईन फाऊंडेशन यांचे माध्यमातून पनवेल परिमंडळ 2चे पोलीस उपआयुक्त शिवराज पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले आहे, तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त फणसवाडी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या मदतीमुळे तेथील सर्व आदिवासी लोकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper