Breaking News

कर्ता-करविता एकाच हॉटेलात

राज-पवारांच्या भेटीवर भाजपची टीका

सोलापूर : प्रतिनिधी

नांदेडनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सोलापूर येथे जाहीर सभा झाली. या सभेची आणखी एक वेगळीच चर्चा रंगली आहे; कारण ज्या हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता, त्याच हॉटेलमध्ये शरद पवार हेही थांबले होते. त्यामुळे भाजपने याच मुद्द्यावरून शरद पवार सांगतात तसे राज ठाकरे करतात, अशा आशयाचे ट्विट करीत राज-पवार भेटीवर टीका केली आहे.

सोलापूर दौर्‍यात राज ठाकरेंच्या सभेसोबतच बाजूच्या जिल्ह्यात शरद पवारांची सभा होती. दोघेही सभा आटोपल्यानंतर हॉटेलात परतले. ठाकरे आणि पवार सोलापुरातील हॉटेलबाहेर भेटतानाचे छायाचित्र भाजपने ट्विट करीत ‘कर्ता’ आणि ‘करविता’ एकत्र येणे स्वाभाविक आहे, कारण ‘गंगाधर ही शक्तिमान है’ हे अवघ्या महाराष्ट्राला ठावूक आहे, असा खोचक टोला लगावला आहे.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply