पतियाळा ः वृत्तसंस्था
हरयाणाचा क्रिशन कुमार आणि पंजाबची हरमिलन बेन्स यांनी चमकदार कामगिरी करीत राष्ट्रीय अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत अनुक्रमे पुरुष आणि महिलांच्या 800 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली. महाराष्ट्राच्या सिद्धांत थिंगालिया याने 110 मीटर अडथळा शर्यतीत सुवर्णपदक पटकावले.
क्रिशनला उत्तराखंडच्या अनू कुमारने कडवी लढत देण्याचा प्रयत्न केला, पण क्रिशनने आपला वेग आणि कामगिरीत सातत्य राखत एक मिनिट 50.12 सेकंद अशी वेळ नोंदवत सुवर्णपदक मिळवले. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणार्या हरयाणाच्या मनजित सिंगला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या आदेश यादव याला पाच हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. उत्तर प्रदेशच्या कार्तिक कुमारने 14 मिनिटे 42.76 सेकंद अशी वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले.
हरमिलन हिला राष्ट्रीय क्रीडा संस्थेतील चाहत्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला. एम. आर. पूवाम्मा हिला पहिल्याच फेरीत मागे टाकल्यानंतर हरमिलनने दिल्लीच्या शालू चौधरी आणि चंदा यांच्यावर सरशी साधत सुवर्णपदक मिळवले. चंदा हिने रौप्य, तर श्रीलंकेच्या निमाली लियानाराची हिने कांस्यपदक जिंकले.
Check Also
रिटघर येथे लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सवी वर्ष शुभचिंतन समारंभ उत्साहात
विद्यालयासाठी ४० लाखांची घोषणा पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, थोर देणगीदार, …
RamPrahar – The Panvel Daily Paper