Breaking News

फुंडे महाविद्यालयात तु. ह. वाजेकर जयंती साजरी

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर

फुंडे येथील रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात वीर तुकाराम हरी वाजेकर यांची 115वी जयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त महाविद्यालयात व्याख्यानाचे व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. बी. ओहोळ होते. उरण येथील ज्येष्ठ पत्रकार प्रदीप पाटील यांनी वाजेकर जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण केले. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओहोळ यांनी त्यांच्या नवोपक्रमाचे अभिनंदन केले. दुपारच्या सत्रात डॉ. विद्या नावडकर यांनी ‘वीर वाजेकर जीवन व कार्य’ या विषयावर व्याख्यान दिले. डॉ. नावडकर यांनी तु. ह. वाजेकर यांच्या जीवनातील ठळक प्रसंग सांगून त्यांच्या कार्याची उपयुक्तता व महत्त्व विशद केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओहोळ यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात वाजेकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. तसेच रायगड जिल्ह्यात त्यांनी केलेले कार्य पुढच्या अनेक पिढ्यांना प्रेरणादायी राहील, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राम गोसावी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.आबासाहेब सरवदे यांनी, तर आभार उपप्राचार्य प्रा. यु. टी. घोरपडे यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन उपप्राचार्य डॉ. विलास महाले, प्रा. राम. गोसावी, ऑफीसप्रमुख आहेर यांनी केले. 

Check Also

खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …

Leave a Reply