Breaking News

म्हसळाकरानी महावितरणचे थकविले रुपये 4 कोटी 52 लक्ष 47 हजार

म्हसळा : प्रतिनिधी

तालुक्यातील 5073 वीज ग्राहकांनी महावितरणचे तब्बल चार कोटी 52 लाख 47 हजार थकविले असून, त्याच्या वसुलीसाठी यापुढे कोणतीही सवलत मिळणार नाही, असे महावितरणचे म्हसळा येथील उपकार्यकारी अभियंता प्रदीप पटवारी यानी सांगितले. म्हसळा तालुक्यातील आंबेत, खामगाव, मेंदडी, म्हसळा शहर या विभागातील 5776 ग्राहकांनी वीज बिलांपोटी चार कोटी 52 लाख 47 हजार रुपये थकविले आहेत. यामध्ये घरगुती, व्यवसायिक, औद्योगिक, सरकारी कार्यालये, शेती, पथदिवे, नळ पाणी पुरवठा आणि इतर ग्राहकांचा समावेश आहे. करोना काळात म्हणजे एप्रिल 2020 पासून ग्राहकांना वीज बिलात सूट देण्यात आली होती. मात्र आता थकीत वीज बिल ग्राहकांच्या जोडण्या तोडण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार म्हसळा तालुक्यातील वीज बिल थकबाकीदार ग्राहकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. म्हसळा महावितरणकडून दररोज 100 हून अधिक थकीत वीज जोडण्या कापण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

म्हसळा तालुक्यातील थकबाकीदार ग्राहक

प्रकार      :  संख्या :   थकबाकी रक्कम

व्यवसायिक : 390     : 10 लाख 77 हजार

औद्योगिक  : 046     :  2 लाख 32 हजार

शेती       : 059     :  54 हजार

पथदिवे     : 131     : 3 कोटी 73 लाख      

                       11 हजार

नळ पाणीपुरवठा  : 62 : 8 लाख 11 हजार

शासकीय वापर : 113 :  4 लाख 56 हजार

महावितरणच्या आर्थिक संकटाचा विचार करून वीज ग्राहकांनी थकबाकीचा त्वरीत भरणा करावा व सहकार्य करावे. -प्रदीप पटवारी, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, म्हसळा.

15 व्या वित्तआयोगातील निधीतून पथदिवे आणि पाणीपुरवठा वीज देयके आदा करण्याबाबत ग्रामविकास विभागामार्फत पत्र आले आहे. -सुनिल गायकवाड, विस्तार अधिकारी,  तालुका पंचायत समिती, म्हसळा

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply