पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ म्हात्रे (पाटील) यांच्या पत्नी जनाबाई यांचे रविवारी (दि. 18) अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 65 वर्षांच्या होत्या.
जनाबाई म्हात्रे (पाटील) यांच्या पार्थिवावर पनवेल येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कै. जनाबाई यांच्या पश्चात पती लक्ष्मणशेठ म्हात्रे (पाटील), पुत्र अविनाश, शैलेश व सचिन, मुलगी राजश्री दीपक म्हात्रे, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
दरम्यान, सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता आप्तेष्ठ, नातेवाईक, हितचिंतकांनी प्रत्यक्ष भेटायला न येता फोनवरून आपल्या सहवेदना व्यक्त कराव्यात, असे आवाहन म्हात्रे (पाटील) कुटुंबीयांकडून करण्यात आले आहे.
Check Also
अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती
भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद …
RamPrahar – The Panvel Daily Paper