Breaking News

राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या योगिनी पाटीलला रौप्यपदक

पनवेल ः वार्ताहर

पनवेलमधील दोन मुलींनी 25 जुलै ते 31 जुलैदरम्यान हरियाणाच्या सोनीपत येथे आयोजित चौथ्या बीएफआय राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. यामध्ये योगिनी पाटील ही 52 किलो वजनी गटात खेळली व तिने रौप्यपदक जिंकले. योगिनीने प्राथमिक तसेच उपांत्य फेरीत मध्य प्रदेश, प. बंगाल आणि दिल्लीच्या बॉक्सर्सचा पराभव केला. अंतिम सामन्यात ती हरियाणाच्या बॉक्सरकडून हरली, तर मधुरा पाटील 54 किलो वजनी गटात खेळली आणि क्वार्टर फायनलमध्ये हरियाणाकडून हरली. प्राथमिक फेरीत तिने ओडिशाच्या बॉक्सरचा पराभव केला होता. योगिनी आणि मधुरा या दोन्ही बॉक्सर्स खेलो इंडियासाठी पात्र झाल्या आहेत, ज्या फेब्रुवारी 2022मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. या खेळाडूंना एमपीएसए बॉक्सिंग क्लबमध्ये अद्वैत शेंबवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी ऑलिम्पियन अर्जुन पुरस्कार विजेते मनोज पिंगळे यांचे प्रशिक्षण मिळत आहे.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply