Breaking News

आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन साजरा; कर्जत तालुक्यात बाईक रॅली

कर्जत : बातमीदार

आंतरराष्ट्रीय आदिवासी दिनानिमित्त कर्जत तालुक्यातील आदिवासी समाजाने सोमवारी (दि. 9) बाईक रॅली काढून आनंदोत्सव साजरा केला. नेरळ येथील हुतात्मा चौकातून काढलेल्या बाईक रॅलीची सांगता कशेळे येथे सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. कर्जत तालुका आदिवासी समाज संघटना आणि आदिवासी सेवा संघाच्या माध्यमातून सोमवारी आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन साजरा करण्यात आला. आदिवासी दिन तसेच ऑगस्ट क्रांतिदिन या कार्यक्रमाची सुरुवात नेरळ येथील हुतात्मा चौकातून झाली. हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या अर्धपुतळ्याला बुधाजी हिंदोळा, जैतु पारधी, सुनील पारधी, गणेश पारधी यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. तेथे जि. प. सदस्या अनसूया पादिर आणि कर्जत पं. स.च्या उपसभापती जयवंती हिंदोळा यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून बाईक रॅलीची सुरुवात झाली. ही बाईक रॅली नेरळ ग्रामपंचायत कार्यालय येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आली. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून हुतात्मा हिराजी पाटील चौकात आली. तेथे आदिवासी तरुणांनी आणि महिलांनी नृत्य सादर केले. पुढे ही बाईक रॅली नेरळ-कशेळे रस्त्याने कशेळे नाका येथे पोहचली. तेथे आदिवासी महिलांनी पारंपरिक नृत्य सादर करीत आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन साजरा केला. आदिवासी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष मालू निरगुडा, कर्जत तालुका अध्यक्ष भरत शिद, उपाध्यक्ष मंगल केवारी, ज्येष्ठ कार्यकर्ते सीताराम केवारी, माजी सरपंच दादा पादिर, बाळा पादिर, महिला आघाडी अध्यक्ष रेवता ढोले, आदिवासी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष जैतु पारधी, तालुका अध्यक्ष बुधाजी हिंदोळा, उपाध्यक्ष भगवान भगत, सचिव गणेश पारधी, चंद्रकांत पारधी, नामदेव निरगुडा, बाळू ठोंबरे यांच्यासह कार्यकर्ते व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply