उरण : वार्ताहर
उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच ई-पीक पाहणी अॅपचे प्रशिक्षण तहसीलदार कार्यालयात आयोजित करण्यात आले.
शासनाच्या परिपत्रकानुसार शेतकर्यांसाठी स्वतःच्या शेतातील पीक पेरा भरण्याच्या कामासाठी त्यांना ई-पिक पाहणी डेमो अॅपचे प्रशिक्षण शिबिर देण्यात येत आहे. त्याअनुषंगाने उरणमध्येही शेतकर्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
तालुक्यातील मंडळ अधिकारी, सर्व तलाठी, सर्व कृषी सहाय्यक मंडळ अधिकारी, सर्व कृषी सहाय्यक यांना ई-पीक पाहणी अॅपद्वारे शेतकर्यांनी पिकपेरा आपल्या शेतजमिनीचा कसा भरावयाचा याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
या योजनेचे प्रशिक्षण प्रत्येक शेतकर्यांनी घेऊन त्यानंतर 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत खरीप हंगामाचे पीक पेरे स्वतः नोंदवून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी या वेळी शेतकर्यांना केले.