उरण : वार्ताहर
तालुक्यातील बोकडविरा येथील मयूर कदम याची प्रो कबड्डी लीग या स्पर्धेच्या आठव्या हंगामासाठी निवड झाली आहे. गणेश क्लब बोकडवीरा या स्थानिक संघाकडून खेळणार्या मयूर कदम याला बंगळुरू बुल्स संघाने 15 लाख रुपये देऊन आपल्या संघात निवड केली आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघ आणि प्रो कबड्डीसाठी निवड झालेला मयूर कदम हा उरण तालुक्यातील पहिला खेळाडू ठरला आहे.
मयूर जगन्नाथ कदम हा 24 वर्षीय खेळाडू उरणमाधील गणेश क्लब बोकडवीरा या स्थानिक संघाकडून कबड्डी खेळतो. त्या संघाच्या माध्यमातून त्याने अनेक कबड्डी स्पर्धांत आपला उत्कृष्ट खेळ केला आहे. मयूर कदम याच्या निवडीमुळे उरण तालुक्यातील कबड्डी खेळाडूंना एक नवी ऊर्जा प्राप्त होणार आहे. त्यामुळे गेली कित्येक वर्ष कबड्डीचा सूर निघत असलेली उरण तालुक्यातील कबड्डी आता वेगाने मैदान गाजवणार आहे हे निश्चित. मयूरचे या निवडीबद्दल गणेश क्लब बोकडवीरा संघाने व उरणकरांनी अभिनंदन केले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper