Breaking News

डी कॉक-यादव जोडीने मोडला रायुडू-धोनीचा विक्रम

मुंबई : प्रतिनिधी

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या क्विंटन डी कॉक आणि सूर्यकुमार यादव यांनी दमदार खेळ केला. दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी करताना अंबाती रायुडू व महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडला आहे.

डी कॉक आणि यादव यांनी दुसर्‍या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली. यासोबत आयपीएलच्या बाराव्या हंगामात जयपूरच्या सवाई मानसिंह मैदानावर सर्वात जास्त भागीदारी रचण्याचा विक्रम या जोडीने आपल्या नावावर केला आहे. मुंबईच्या या फलंदाजांनी महेंद्रसिंह धोनी-अंबाती रायुडू जोडीचा 95 धावांचा विक्रम मोडीत काढला.

आयपीएलच्या बाराव्या हंगामात

जयपूरच्या मैदानावर सर्वाधिक भागीदारी

– क्विंटन डी कॉक-सूर्यकुमार यादव : 97 धावा

– अंबाती रायुडू-महेंद्रसिंह धोनी : 95 धावा

– ख्रिस लिन-सुनील नारायण : 91 धावा

– ख्रिस गेल-सरफराज खान : 84 धावा

– क्विंटन डी-कॉक-सूर्यकुमार यादव : 84* धावा

Check Also

रक्तसाठा अद्ययावत माहितीच्या मुद्द्यावर आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष

रक्तसाठ्याची माहिती वेळेवर अद्ययावत न करणाऱ्या रक्तकेंद्रांवर दंडात्मक कारवाई -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई : रामप्रहर …

Leave a Reply