Breaking News

महापारेषणचे अध्यक्ष दिनेश वाघमारेंना अ‍ॅवॉर्ड

मुंबई : प्रतिनिधी

नवी दिल्ली येथील ग्रीनटेक फाऊंडेशनच्या वतीने दिला जाणारा यंदाचा ग्रीनटेक लिडिंग डायरेक्टर अ‍ॅवॉर्ड-2021 हा जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार डॉ. फारूक अब्दुला यांच्या हस्ते महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांना प्रदान करण्यात आला. जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्गमध्ये झालेल्या ग्रीनटेक लिडिंग डायरेक्टर परिषदेत हा पुरस्कार देण्यात आला. या वेळी जम्मू आणि काश्मीरचे माजी पर्यावरण व वनसंपदामंत्री मिया अल्ताफ अहमद, ग्रीनटेक फाऊंडेशनचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी कमलेश्वर शरण, महापारेषणचे कार्यकारी संचालक (मानव संसाधन) (प्रभारी) सुगत गमरे, वाशी परिमंडळाचे मुख्य अभियंता नसीर कादरी उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वाघमारे यांचे अभिनंदन केले आहे.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply