रेवदंडा : प्रतिनिधी
अलिबाग व मुरूड रस्त्यावर वाढत्या वाहतुकीचा ताण मध्यवर्ती ठिकाण असलेल्या चौल नाक्यावर पडत असून, येथे नित्य वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.
दिवसेंदिवस अलिबाग व मुरूड तालुक्यात पर्यटकांच्या वाढत्या संख्येने येथील मुख्य रस्त्यावर वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी येथील रस्त्याला वाहतुकीचा ताण पडून वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. चौल नाका हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे वाहनांची गर्दी होत असून, रस्ता मोठा असूनसुद्धा वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त काही वेळेपुरताच असतो. दिवसरात्र 24 तास या मार्गाने वाहतूक होत असल्याने येथे सतत पोलीस बंदोबस्त गरजेचा आहे. तसेच चौल नाक्यावरील रस्त्याचा परिसर धोकादायकसुद्धा आहे. येथे पोलीस बंदोबस्तासह सिग्नल लाईटचीही अवश्यकता असल्याची येथील ग्रामस्थांची मागणी आहे.