आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातही विविध विकासकामे

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते चिंध्रण येथे शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून आणि त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे चिंध्रण परिसरामध्ये अनेक विकासकामांना गती मिळाली आहे. या विविध कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 26) उत्साहात पार पडला.
चिंध्रण सारनाथ बुद्धविहार येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतंर्गत 40 लाख रुपये खर्चून उभारण्यात येणारे सभागृह व सुशोभीकरण तसेच आमदार ठाकूर यांच्या 25 ः 15 निधीतून 10 लाख रुपये खर्चाच्या अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन या वेळी करण्यात आले. याचबरोबर महिला बचत गटाच्या इमारतीचे भूमिपूजन आणि वपल येथे एमएमआरडीएच्या 40 लाख रुपयांच्या निधीतून पाले बुद्रुक मुख्य रस्ता ते गणेशनगरपर्यंत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. कल्पेश शहा यांचे घर ते गणपती मंदिर या भागातील 13 लाख रुपये खर्चाचे अंतर्गत गटार व काँक्रीटीकरण, कोणार्क बिल्डिंग ते वसंत पाटील यांच्या घरापर्यंतचा रस्ता आणि जिल्हा परिषद सेस फंडातून 10 लाख रुपये खर्चून पूर्ण करण्यात आलेल्या मोतीराम टेंबे ते अप्पा महादेव पाटील यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. याशिवाय जिल्हा वार्षिक योजनेतून बसवण्यात आलेले तीन सोलर हायमास्ट आणि 10 सोलर स्ट्रीट लाईट्सदेखील जनतेसाठी समर्पित करण्यात आले.
या शुभारंभावेळी भाजप नेते एकनाथ देशकर, पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, माजी सरपंच कमला देशेकर, नेरे विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, उत्तर मंडळ सरचिटणीस अंकुश पाटील, रमेश कोटणी, माजी नगरसेविका अरुणा दाभणे, सरपंच एकनाथ पाटील, माजी सरपंच रघुनाथ फराड, शिवाजी दुर्गे, प्रकाश खैरे, अरविंद गोंधळी, धनाजी पाटील, अंकुश पाटील, अशोक साळुंखे, धनंजय पाटील, लक्ष्मण पाटील, महेश पाटील, रवींद्र पाटील, बाळकृष्ण पाटील, निवृत्ती पाटील, नंदकुमार भोपी, रूपेश पावशे, सीबी पाटील, हरिचंद्र गोंधळी, माजी उपसरपंच गणपत देशेकर, वलप गाव अध्यक्ष प्रभाकर पाटील, वावंजे पंचायत समिती विभागीय अध्यक्ष प्रकाश खैरे, डॉ. संतोष आगलावे, गणपत कडू, अनंता कडू, नरेश सोनावले, दिनेश पाडेकर, शंकर देशेकर, अभिमन्यू पाटील, राजेंद्र पाटील, शांताराम कुंभारकर, ग्रामपंचायत सदस्य संतोष देशेकर, मनोज कुंभारकर, कुसुम पाटील, जीवन पाडेकर, सुरेश पाटील, चंद्रकांत पाटील, लहूशेठ पाटील, कोंडीराम पाटील, काळुराम घोडिंदे, मोतीराम टेंबे, रामदास पाटील, हिरामण पाटील, हरिश्चंद्र पाटील, बाबूशेठ मुंबईकर, रऐपेश मुंबईकर, सुरेश मुंबईकर, बाळकृष्ण पाटील, नासिर शेख, नंदू भोपी, सागर सांगडे, प्रकाश खाडेकर, किरण पाटील, युवराज पाटील, जीवन पाटील, सोपान खाडेकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या विकासकामांमुळे चिंध्रण परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply