Breaking News

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून चित्रकार केविन डायसचे अभिनंदन

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल येथील चित्रकार केविन डायस याने केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने राष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून देणारा भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा यांचे सुवर्णपदक स्वीकारत असलेल्या क्षणाचे हुबेहूब चित्र साकारले. या चित्राला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. त्याबद्दल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केविनच्या घरी जाऊन त्याचे अभिनंदन व कौतुक केले.

या वेळी नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, भाजप युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सचिव चिन्मय समेळ, युवा नेते पवन सोनी आदी उपस्थित होते.

केविनने याआधीसुद्धा डिजिटल इंडिया संकल्पनेवर आधारित ऑनलाइन चित्रकला स्पर्धेत देशभरातून प्रथम क्रमांक पटकावला होता.

‘केविन डायस तुझे संपूर्ण पनवेलकरांतर्फे खूप खूप अभिनंदन व राष्ट्रीय स्तरावर पनवेलचे नाव अधोरेखित केल्याबद्दल मनःपूर्वक आभार,’ अशा शब्दांत परेश ठाकूर यांनी केविनचे कौतुक केले.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply