पनवेल, रोहे : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 21) दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.
गणपती विसर्जनानंतर तालुक्यात पावसाची उघडझाप सुरू होती, मात्र मंगळवारी सकाळी जोरदार हजेरी लावल्यानंतर सायंकाळपर्यंत पावसाची संततधार सुरू होती. त्याचा परिणाम बाजारपेठेत दिसून आला. पावसामुळे बाजारपेठेत ग्राहक दिसत नव्हते.
दरम्यान, जिल्ह्यात या वर्षी चांगला पाऊस पडल्यामुळे भातशेती बहरली आहे. काही भागात लावणी लवकर झाली असल्याने भाताला दाणे येण्यास सुरुवात झाली आहे, तर काही ठिकाणी ही स्थिती प्राथमिक स्वरूपात आहे. पाऊस असाच कायम राहिल्यास मात्र त्याचा भातशेतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Check Also
‘सामना’ पन्नाशीचा झाला…
काही कलाकृतींचे महत्त्व व अस्तित्व हे कायमच अधोरेखित होत असते. ते चित्रपटगृहातून उतरले तरी त्यांचा …