पनवेल : रामप्रहर वृत्त
माथेरान गिरीस्थान नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीने सत्ता मिळवली असून भाजपच्या विजयी उमेदवारांनी शुक्रवारी (दि. 25) आमदार प्रशांत ठाकूर आणि उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांची भाजपच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात सदिच्छा भेट घेतली.
या वेळी भाजप राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, दीपक बेहेरे, कर्जतचे माजी तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर, माथेरान नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, शहर अध्यक्ष प्रवीण सकपाळ, नेरळ मंडल अध्यक्ष नरेश मसणे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
माथेरानमध्ये भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये प्रतिभा प्रदीप घावरे, संतोष अरविंद शेलार, प्रियांका विनोद कदम यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे तेथे भाजपचे कमळ पहिल्यांदाच फुलले असून नवनिर्वाचित नगरसेवकांचे आमदार प्रशांत ठाकूर व अन्य मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper