Breaking News

कामोठ्यात फूड मार्केटचे उद्घाटन

कामोठे : रामप्रहर वृत्त

कामोठे येथे ‘फूड बास्केट’ हे फूड मार्केट नव्याने सुरू झाले आहे. या मार्केटचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. 15) करण्यात आले.

कामोठे शहरातील वाढते नागरीकरण लक्षात घेता या परिसरात नवनवीन उद्याोगांना चालना मिळत आहे. त्या अंतर्गत कामोठे सेक्टर 12 येथे फूड बास्केट नावाचे फूड मार्केट सुरू झाले आहे. या मार्केटच्या उद्घाटन समारंभास पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, विकास घरत, रामजी बेरा, नगरसेविका अरुणा भगत, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, रवी जोशी, राजेश गायकर, रमेश म्हात्रे, महेंद्र भोपी, युवा मोर्चा कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, तेजस जाधव, हरिश्चंद्र जोशी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी फूड मार्केटचे मालक गणेश चौधरी, भांजी रवारीया, देवजी चौधरी यांचे उपस्थितांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

नवी मुंबई विमानतळाला ‌‘दिबां‌’चे नाव द्या; भाजपचे लक्षवेधी आंदोलन

पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी …

Leave a Reply