Breaking News

छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुनर्रिक्षण कार्यक्रम जाहीर

अलिबाग : जिमाका

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2022 या अर्हता आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुनर्रिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

या कार्यक्रमानुसार मा. भारत निवडणूक आयोगाकडून विकसित करण्यात आलेला तेींशी कशश्रश्रिळपश अिि (तकअ) हा अ‍ॅप सर्व नागरिक, मतदारांसाठी अतिशय उपयुक्त आहे. हे अ‍ॅप झश्ररू ीीेींश (अपवीेळव)/अिि ीीेींश (ळजड) मधून डाऊनलोड करून घेऊ शकतो.  प्रथम रजिस्ट्रेशन करून श्रेस ळप करता येते.

नवीन मतदार नोंदणी करण्यासाठी, तसेच पहिल्या वेळी मतदार म्हणून किंवा इतर मतदारसंघातून स्थलांतरित झाल्यामुळे मतदार यादीत नाव समाविष्ट करावयाचा असल्यास या अ‍ॅपमधील फॉर्म नं. 6 भरता येईल, फॉर्म न. 7 द्वारे इतर व्यक्तींचे नाव समाविष्ट करण्याबद्दल आक्षेप घेण्यासाठी स्वतःचे नाव किंवा इतर कोणत्याही व्यक्तीचे नाव, मृत्यू, स्थलांतरीत झाल्याने त्या मतदारांचे नाव वगळणी करता येईल, फॉर्म नं 8 द्वारे मतदार यादीतील मतदाराच्या तपशिलामध्ये बदल किंवा दुरुस्ती करता येईल, मतदारांचा एकाच विधानसभा मतदारसंघातील यादीभागात

नाव स्थलांतरीत करावयाचे  असल्यास फॉर्म नं. 8 अ भरून बदल करता येईल.

निवडणूक आयोगाने विकसित करण्यात आलेल्या तेींशी कशश्रश्रिळपश अिि (तकअ) सर्व नागरिकांनी, मतदारांनी डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन रायगड जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, तसेच उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे यांनी केले आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply