Breaking News

भाजप वेणगाव पंचायत समिती गणातर्फे लसीकरण

कर्जत : बातमीदार

भारतीय जनता पक्षाच्या सेवा सप्ताह अभियान अंतर्गत कर्जत तालुक्यातील वेणगाव पंचायत समिती गण भाजपच्या वतीने लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी स्थानिक 210 ग्रामस्थांनी कोविड लसीचे लसीकरण करून घेतले. धाकटे वेणगाव येथील मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या शिबिराला भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, चिटणीस रमेश मुंढे, उद्योग सेल जिल्हा संयोजक मंदार मेहेंदळे, कर्जत शहर सरचिटणीस प्रकाश पालकर, भाजप वेणगाव पंचायत समिती गणाचे अध्यक्ष किरण घाग, विठोबा कांबरी, ज्ञानेश्वर म्हसे, गीतेश कदम सचिन म्हसे, यश मुंढे, समीर मुंढे, गणेश मुंढे, भारती मुंढे, मंगेश साळुंखे, अंकुश कदम, संजय सावळा, तुषार जोशी, मनोहर घाडगे, शौकत शेख आदी उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य मनीषा घाडगे, तृषाली मुंढे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मदत केली.

Check Also

शेल इंडिया मार्केट्स कंपनीच्या कामगारांना भरघोस वेतनवाढ

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करार पनवेल : रामप्रहर वृत्तशेल एम्प्लॉईज युनियनच्या मार्गदर्शनाखाली शेल …

Leave a Reply