Breaking News

रायगडच्या खेळाडूंची राष्ट्रीय दोरीउडी स्पर्धेसाठी निवड

पनवेल ः रामप्रहर वृत्त

कोल्हापूर येथे झालेल्या पहिल्या राज्यस्तरीय दोरी उडी स्पर्धेत रायगड जिल्यातील खेळाडूंनी सात सुवर्ण आणि चार रौप्यपदकांची कमाई केली. या खेळाडूंची संभाजी नगर (औरंगाबाद) येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र आणि कोल्हापूर जम्प रोप असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत राज्यातील 17 जिल्ह्यांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या वेळी जंप रोप असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष मंदार पनवेलकर, सचिव संतोष खंदारे, प्रशिक्षक निलेश भोसले उपस्थित होते. या स्पर्धेत रायगड  जिल्ह्यातील संजना चव्हाण, वैष्णवी मोरे, हर्षदा कारंडे, कृपाश्री शेट्टी, चिराग शिवगण, कृष्णा पांडे, नावीन्य साळगावकर यांनी सुवर्णपदक, तर अंतरा दळवी, अन्वी सणस, ऐशानी सरकार, स्कंद धस यांनी रौप्यपदक पटकाविले.

Check Also

महात्मा फुले महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ

मान्यवरांची लाभली उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान …

Leave a Reply