पनवेल ः रामप्रहर वृत्त
खारघर से. 11 मधील शिवशंभो सोसायटीत प्रतीक्षा मंगेश कदम यांच्या मागणीनुसार पनवेल महापालिकेमार्फत रविवारी (दि. 17) कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिर घेण्यात आले. या शिबिराला भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. लसीकरण शिबिराचा 150पेक्षा जास्त नागरिकांनी लाभ घेतला. या वेळी नगरसेवक शत्रुघ्न काकडे, प्रवीण पाटील, भाजप अध्यक्ष ब्रिजेश पटेल, कीर्ती नवघरे, मंगेश कदम, गीता चौधरी, मोना अडवाणी, साधना पवार, अश्विनी भुवड, सुप्रिया दळवी उपस्थित होते. शिबिराचे नियोजन अभिषेक इंगळे यांनी केले, तर अजय इंगळे, निलेश नाईकवाडी, अंकुर शर्मा, अजय गर्जे, रोहित शिंदे, प्रफुल्ल चंदनशिवे, तसेच सोसायटी पदाधिकारी, रहिवाशांचे सहकार्य लाभले.
Check Also
पालेखुर्द येथील जि.प. शाळेच्या नूतन इमारतीचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्तमहाराष्ट्राची मराठी संस्कृती अत्यंत समृद्ध आणि महान असून ती जपणे तसेच पुढील …
RamPrahar – The Panvel Daily Paper