Breaking News

नवीन पनवेलमध्ये नागरी सुविधांची वानवा

सिडकोचे दुर्लक्ष; तत्काळ उपाययोजनेची मागणी

पनवेल : वार्ताहर

नवीन पनवेलमध्ये सिडकोने केलेल्या निकृष्ट दर्जांच्या कामामुळे अनेक ठिकाणी नागरी सुविधांची दुरवस्था झाली आहे. पाईपलाईन फुटल्यामुळे सांडपाणी फुटपाथवर पसरून वाहत आहे तसेच रस्त्यांवरील मेन होल वरील झाकणे तुटलेली अवस्थेत आहेत. या सर्व समस्यांकडे सिडको प्रशासना दुर्लक्ष करीत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

सेक्टर 14 येथील ई वन परिसरातील सांडपाणी गटारीमध्ये सोडतात मात्र सांडपाण्याचे पाईप तुटल्यामुळे फुटपाथवर सर्व पाणी साचत आहे. आधीच नवीन पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात डेंग्यू, मलेरिया सारखे आजाराची साथ पसरत असतांना या सांडपाण्यामुळे रोगराई पसरण्याची भिती येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून सिडकोच्या संबंधित खात्याने यावर त्वरित उपाय योजना करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशी करीत आहेत.

गेल्या वर्षी सिडकोने नवीन पनवेलमध्ये लाखो रुपये खर्च करुन नविन रस्ते बनविले, मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यांवरील मेन होलची झाकणे रस्त्याच्या खाली गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात चारचाकी, दुचाकी गाड्यांचे अपघात होत असतात. नवीन पनवेल बांठीया शाळेसमोरिल रस्ता, सेक्टर 14 जवळील आमराईच्या रस्त्यावर तसेच सेक्टर 17 जवळील रेल्वेस्थानकाकडे जाणार्‍या रस्त्यांवरील मेन होल वरील झाकणे तुटलेली अवस्थेत आहेत. या रस्त्यांवर गाड्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. यामुळे येथील मेन होल वरील झाकणे तत्काळ दुरुस्त करावी, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.

Check Also

चित्रपटाचे यश अन् सेलिब्रेशन

चित्रपट सुपर डुपर हिट होण्यातील सर्वात महत्त्वाचा घटक अर्थात प्रेक्षक. या प्रेक्षकांना चित्रपट आवडला रे …

Leave a Reply