Breaking News

मुरूडमध्ये रविवारी पर्यटकांची संख्या रोडावली

भारत विरुद्ध पाकिस्तान लढतीमुळे पर्यटकांना ओहोटी

मुरूड : प्रतिनिधी

आज रविवार असूनसुद्धा पर्यटकांनी मुरूडच्या समुद्र किनार्‍यावर फार कमी संख्येने हजेरी लावल्यामुळे फारशी गर्दी दिसून आली नाही. मागील आठवड्यात पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला, परंतु आज मात्र पर्यटकांनी सपशेल पाठ फिरवली. त्यामुळे समुद्र किनारी व्यवसाय करणारे घोडेस्वार बसूनच होते.

रविवारी टी-20 वर्ल्ड कप क्रिकेट मॅचमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान अशी लढत होणार असल्याने पर्यटकांनी पर्यटनासाठी येणे टाळले. राज्यातील विविध भागांतून पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक या समुद्र किनारी येत असतात, परंतु रविवारच्या महत्त्वपूर्ण सामन्यामुळे पर्यटकांनी घरात बसून सामना बघण्याचे निश्चित केल्याने  समुद्र किनारी फारशी गर्दी झाली नाही.

मुरूड हे पर्यटन स्थळ असून येथे शनिवार, रविवार पर्यटकांची गर्दी असते. परंतु कालच्या रविवारी पर्यटकांनी फारच कमी संख्येने हजेरी लावल्याचे दिसून आले आहे. काशीद समुद्र किनारीसुद्धा पर्यटकांची फारच अल्प उपस्थिती दिसून आली. काशीद हे आंतराष्ट्रीय पर्यटन ठिकाण  असल्याने  येथे सर्वाधिक शनिवार व रविवार मोठी गर्दी असते. परंतु येथे सुद्धा पर्यटक फार अल्प प्रमाणात उपस्थित होते.

याबाबत काशीद ग्रामपंचायतीचे सदस्य संतोष राणे यांनी सांगितले की, रविवार असूनसुद्धा काशीदमध्ये पर्यटकांची अल्प उपस्थिती आहे. पर्यटकांच्या अल्प उपस्थितीमुळे समुद्र किनार्‍यावर फारशी गर्दी दिसून आली नाही.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply