Breaking News

आर्यन खान प्रकरणात 25 कोटींची डील? ; व्हिडीओतून आरोप

मुंबई ः प्रतिनिधी
आर्यन खान ड्रग्जप्रकरणी एक व्हिडीओ समोर आला आहे. हे प्रकरण दाबण्यासाठी 25 कोटी रुपयांची डील झाली असून त्यातील आठ कोटी रुपये एनसीबीचे विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांना मिळणार असल्याचा दावा साक्षीदार के. पी. गोसावीचा सुरक्षा रक्षक प्रभाकर साईलने या व्हिडीओत केला आहे. या व्हिडीओत प्रभाकर साईल म्हणतो की, आम्ही लोवर परेलच्या दिशेने गेलो. तिथे ब्रिजखाली आमची गाडी जाऊन उभी राहिली. पाठीमागून इनोव्हा कार आली. अचानक त्या गाडीमागे निळ्या रंगाची मर्सिडिज आली. त्या गाडीत अभिनेता शाहरूख खानची मॅनेजर बसलेली होती. यानंतर गोसावी, सॅम आणि पूजा दादलानी या तिघांमध्ये बैठक झाली. या बैठकीत त्या वेळी काय झाले हे मला समजले नाही. गाडीमधून पुन्हा त्यांनी फोन केला की 25 सांग, शेवटी 18 फायनल कर, कारण त्यातील आठ समीर वानखेडेंना जाणार आहेत, तसेच 10 आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. हे त्यांचे फोनवरचे संभाषण मी ऐकले, असे प्रभाकर साईलने सांगितले. त्याचप्रमाणे एनसीबीने खोट्या पंचनाम्यावर सही करायला लावली होती, असा आरोपही केला आहे.

समीर वानखेडे म्हणतात…
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी ‘मी प्रभाकर साईल यांच्या आरोपांना योग्य वेळ आल्यावर उत्तर देईल,’ असे म्हटले आहे. एका माध्यमाला त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

Check Also

हॉटेल सी रॉकचे चित्रपटसृष्टीशी नातेसंबंध…

चित्रपटाच्या जगात एवढे, असे आणि इतके रंग एकमेकांत मिसळले गेले आहेत की त्याचा शोध अजिबात …

Leave a Reply