पाली : प्रतिनिधी
एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात सामील होत आहेत. शिवसेनेचे पेण तालुका प्रमुख तुषार मानकवळे यांनी त्यांच्या अनेक सहकार्यांसह शुक्रवारी (दि. 22) शिंदे गटात प्रवेश केला. अलिबाग येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार महेंद्र दळवी व युवा नेते राजा केणी यांनी त्या सर्वांचे स्वागत केले.
रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते येत्या काही दिवसात शिंदे गटात सामील होतील, असा विश्वास आमदार महेंद्र दळवी यांनी या वेळी व्यक्त केला. तुषार मानकवळे यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. धीरज पाटील, आशिष वर्तक, शैलेश पाटील, दीपक चरवट, विकी मानकवळे, राहुल पाटील, सरिता पाटील, सुशांत घाडगे, हर्षद पाटील आदी या वेळी उपस्थित होते.