Breaking News

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून अक्षता गीधला शिक्षणासाठी एक लाख रुपयांची मदत

पनवेल ः रामप्रहर वृत्त
उच्च शिक्षण घेण्यासाठी पनवेलमधील अक्षता सुरेश गीध हिला श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने एक लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. मदतीचा धनादेश मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 26) डॉ. अर्चना बाथम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.  
अक्षता गीध हि विद्यार्थिनी विलेपार्ले येथील बीएनसीपी कॉलेजमध्ये एम फार्मा शिक्षण घेत आहे. या उच्च शिक्षणासाठी तिला आर्थिक मदतीची गरज होती. त्या अनुषंगाने तिच्या पालकाने केलेल्या मागणीनुसार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळा या सेवाभावी संस्थेच्या वतीने एक लाख रुपयांची मदत करण्यात आली.

Check Also

पनवेलमधील बेघर निवारा प्रकल्पाची महापालिका सदस्यांकडून पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या वतीने सेक्टर १२, प्लॉट क्रमांक २ए येथे उभारण्यात येत असलेल्या …

Leave a Reply