पनवेल ः रामप्रहर वृत्त
न्यायालयात मराठा समाज आरक्षण नाकारले गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज खासदार संभाजीराजे यांची मराठा समाजाला एकसंघ करण्यासाठी जनसंवाद यात्रा मंगळवारी (दि. 26) रायगड जिल्ह्यात आयोजित करण्यात आली होती. या यात्रेचा समारोप पनवेलमध्ये झाला. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी संभाजीराजेंचे पनवेल नगरीत स्वागत केले. यानंतर आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या सभेत मराठा आरक्षणासाठी लाँग मार्च काढला जाईल, असा इशारा संभाजीराजेंनी राज्य शासनाला दिला.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही असा निकाल दिल्यानंतर पुन्हा या लढ्याला सुरुवात तसेच मराठा समाजाला एकसंघ करण्यासाठी रायगडच्या पवित्र भूमीतून खासदार संभाजीराजे यांची जनसंवाद यात्रा मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. या यात्रेचा समारोप पनवेल शहरात झाला. या वेळी खासदार संभाजीराजे यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.
या ठिकाणी पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, मराठा समाज राज्य समन्वयक विनोद साबळे, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा नेते हॅप्पी सिंग, युवा मोर्चा कामोठे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, जिल्हा सरचिटणीस चिन्मय समेळ, पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमांतर्गत आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले की, दुःखी असलेल्या मराठा समाजासाठी हा लढा सुरू असून आरक्षणासाठी मुंबई ते पुणे या मार्गावर लाँग मार्च काढला जाणार आहे.
Check Also
Jedes Online Spielbank wird beflei?igt, stets neue Fans anzuziehen
Nahe den Freespins eignen zudem mehr als einer weitere Optionen gebraucht, um Neukunden nach vollbringen …
RamPrahar – The Panvel Daily Paper