Breaking News

पोलीस स्मृतिदिनानिमित्त शहीद पोलिसांना आदरांजली

मुरूड : प्रतिनिधी

21 ऑक्टोबर हा दिवस म्हणजे पोलीस स्मृतिदिन.    पोलीस कर्मचार्‍यांची निष्ठा, सर्वोच्च बलिदानाचा सन्मान करण्यासाठी, तसेच शहीद पोलिसांच्या शौर्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी, कर्तव्याची आणि राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी याकरिता रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड पोलीस अलिबाग येथील बॅण्ड पथक येऊन मुरूड शहरातील विविध ठिकाणी बॅण्डद्वारे जय जय महाराष्ट्र, जयोस्तुते आदी धून वाजवून आदरांजली वाहण्यात आली. या वेळी पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत म्हात्रे, वाहतूक पोलीस नाईक किशोर बठारे, पोलीस नाईक परेश म्हात्रे, पोलीस शिपाई प्रशांत लोहार व अलिबाग पोलीस बॅण्ड पथक सहभागी झाले होते.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply