Breaking News

सुरेश पोसतांडेल यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड

उरण : वार्ताहर

सुरेश पोसतांडेल हे उरण नगर परिषद येथे लेखाधिकारी पदावर काम करीत आहेत. नगर परिषद, नगरपंचायत कर्मचार्‍यांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करीत आहेत. सुरेश पोसतांडेल यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कर्तव्यदक्ष व प्रामाणिकपणे काम करणारे, स्वच्छ चारित्र्यसंपन्न म्हणून सर्वत्र सुरेश पोसतांडेल यांची ओळख असून सुरेश पोसतांडेल हे उरण नगर परिषद येथे लेखाधिकारी पदावर काम करीत आहेत. ते नगर परिषद, नगरपंचायतीच्या कर्मचार्‍यांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे काम करत असून त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांची निवड महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगरपंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी करण्यात आली आहे.

या वेळी प्रदेश उपाध्यक्षपदी प्रदीप रावनकर, सरचिटणीसपदी रामेश्वर वाघमारे व कोषाध्यक्ष अनिल पवार यांचीही नेमणूक झाली. नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे महाराष्ट्रातील सर्व नगर परिषद व नगर पंचायतमधील सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांकडून अभिनंदन होत आहे. अनेक जणांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून तर काही जणांनी त्यांना सोशल मीडियाद्वारे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply