खोपोली : प्रतिनिधी
नातीला उलटी झाली म्हणून तिचे डोके धरून उभ्या असलेल्या अश्विनी अशोक कदम (वय 64, रा. कुलाबा मुंबई) यांना पाठीमागून आलेल्या कारची जोरदार धडक बसली. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या या अपघातात अश्विनी कदम गंभीर जखमी झाल्या आहेत.
द्रुतगती मार्गावरून प्रवास करीत असताना अश्विनी कदम यांच्या नातीला मळमळ झाल्यासारखे वाटल्याने कार थांबवून त्या उतरल्या होत्या. नातीला उलटी झाल्याने तिचे डोके पकडून अश्विनी उभ्या असताना पाठीमागून वेगात आलेल्या कारची (एमएच-05, बीएल-1756) अश्विनी यांना जोरदार धडक बसली. त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
या प्रकरणी कार चालक जनार्दन सखाराम सांडभोर (डोंबिवली, जि. ठाणे) याच्या विरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार अमित सावंत करीत आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper