Breaking News

पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष स्वच्छता मोहीम

अलिबाग : प्रतिनिधी

स्वच्छतादूत पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्यातर्फे रविवारी (दि. 12) संपूर्ण महाराष्ट्रातील विविध भागांत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा वाढदिवस मंगळवारी (दि. 14) आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छतेचे महत्त्व पटावे व आपले आरोग्य निरोगी राहावे, या हेतूने संपूर्ण महाराष्ट्रात सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी ही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

रायगड जिल्ह्यातही श्री सदस्यांनी रविवारी श्रमदान करून सरकारी कार्यालये, दवाखान्यांचा परिसर तसेच प्रमुख रस्त्यांची साफसफाई केली. या मोहिमेचा भाग म्हणून अलिबाग शहारातील सर्व शासकीय कार्यालये, शासकीय दवाखाने, बस डेपो, सर्व रस्ते, भाजी मार्केट, मच्छी मार्केट, समुद्रकिनारे आदी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. या वेळी जमा झालेल्या कचर्‍याचे ओला व सुका असे विघटन करून अलिबाग डम्पिंग ग्राऊंड येथे जमा करण्यात आला.

अलिबाग शहारातील 17 शासकीय कार्यालयांची आणि 46.20 किमी दुतर्फा रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या 4434 स्वयंसेवकांनी सुमारे 74 हजार चौमी क्षेत्रातील 44.320 टन कचरा गोळा केला. या विशेष स्वच्छता मोहिमेत शासकीय कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार आणि स्थानिक नागरिकही सहभागी झाले होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply