Breaking News

अब हिंदू मार नहीं खाएगा!

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

पुणे : प्रतिनिधी

त्रिपुरामध्ये घटना घडली की नाही हा प्रश्न आहे, पण त्यासाठी अमरावती, नांदेड, मालेगाव मध्ये अशांतता पसरवणे हे कितपत योग्य आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये जे घडले ती, हिंदुंची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. अब हिंदू मार नहीं खाएगा, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते.

1993च्या दंगलीत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी बोटचेपी भूमिका घेतली असती, तर मुंबईत हिंदू जीवंत राहिला नसता, असेही त्यांनी या वेळी मत व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, त्रिपुरामध्ये घटना काय घडली, हे नीट कुणालाही माहिती नाही. त्यासंदर्भात एक व्हिडिओ बनवून व्हायरल केला जातो. त्यानंतर अमरावती, नांदेड, मालेगावमध्ये अशांतता पसरवली जाते. 15 ते 20 हजार संख्येने रस्त्यावर उतरून माजी मंत्री जगदीश गुप्तांसह अनेकांची कार्यालयाची तोडफोड करायची. याचा काय संबंध आहे? त्यामुळे शनिवारच्या घटनेत भाजपचा हात असेल, तर त्यापूर्वीच्या तोडफोडीच्या घटनेत संजय राऊतांचा हात आहे का?

भाजप नेत्यांच्या धरपकडीवर बोलताना माननीय पाटील म्हणाले की, अमरावती, नांदेड, मालेगावमध्ये शुक्रवारी जे घडले, त्यामध्ये ज्यांचा ज्यांचा हात आहे, त्यांना आधी अटक करा. नांदेडमध्ये भाजप जिल्हाध्यक्षांनी बंदची हाक दिली आहे. त्या बंदवर आक्षेप घेणार्‍यांनी शुक्रवारच्या घटनेतील 100 जणांना अटक केली आहे का? हे आधी स्पष्ट करावे, 15 ते 30 हजारचा जमाव रस्त्यावर उतरून अशांतता पसरवतो. तेव्हा पोलिसांचे गुप्तहेर खाते करते, तरी काय? असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply