Breaking News

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रूपेश पावशेला सुवर्णपदक

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेलमधील पैलवान रूपेश पावशे याने उत्तर प्रदेशातील आगरा येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले आहे. याबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
स्पोर्ट्स अ‍ॅण्ड फिजिकल फिटनेस बोर्डच्या वतीने आगरा येथे आयोजित राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी 85 किलो वजनी गटात रूपेश पावशे याची महाराष्ट्रातून निवड झाली होती. आपली निवड सार्थ ठरवत त्याने सुवर्णपदक जिंकले.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचा पैलवान असलेला रूपेश पनवेल तालुक्यातील नितळस गावचा असून चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात क्रीडा शिक्षक आहे. या कामगिरीबद्दल पैलवान रूपेशची हरियाणातील सोनिपत येथे 6 ते 8 जानेवारी 2021 या कालावधीत होणार्‍या आंतराराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Check Also

विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात विविध क्षेत्रांचा अनुभव घ्यावा -लोकनेते रामशेठ ठाकूर

उरण : रामप्रहर वृत्तकर्मवीर अण्णांनी दिलेला शिक्षण आणि संस्कारांचा आदर्श आपल्याला पुढे घेऊन जाणे अत्यंत …

Leave a Reply