मुंबई ः प्रतिनिधी
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा धमक्यांना आम्ही घाबरत नाही, धमकी कोणाला? असा सवाल करत गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्राची जनता घोटाळेबाजांना सजा देणारच, असेही त्यांनी म्हटले आहे.
राज्यात एकाचवेळी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) धाडसत्र सुरू आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे नेतेही ईडीच्या रडारवर आहे, तर भाजप नेते किरीट सोमय्या हेही महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप होत आहे. अशातच सोमय्यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे चर्चेला उधाण आले आहे.
‘शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा धमक्यांना आम्ही घाबरत नाही. धमकी कोणाला? सुप्रीम कोर्टला, हायकोर्टला, ईडीला, भाजपला की किरीट सोमय्यांना? फक्त अनिल देशमुख नाही, जितेंद्र आव्हाडांचीपण अटक झाली, आनंद अडसूळ यांचीपण अटक झाली, महाराष्ट्राची जनता घोटाळेबाजांना सजा देणारच’ असे सांगत सोमय्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
Check Also
उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम
भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …
RamPrahar – The Panvel Daily Paper