Breaking News

राज्यात आता दारू स्वस्त

सरकारने एक्साईज ड्युटी 50 टक्क्यांनी घटवली

मुंबई ः प्रतिनिधी
महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने आयात किंवा आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात केली आहे. त्यामुळे राज्यातील त्याची किंमत इतर राज्यांच्या बरोबरीने झालीय, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क हे खर्चाच्या 300वरून 150 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. आयात केलेल्या स्कॉचच्या विक्रीतून महाराष्ट्र सरकारला वार्षिक 100 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. या कपातीतून सरकारचा महसूल 250 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, कारण त्यामुळे एक लाख बाटल्यांवरून 2.5 लाख बाटल्यांची विक्री वाढेल, असे अधिकार्‍याने सांगितले.
उत्पादन शुल्कात कपात केल्याने महाराष्ट्रात आयात होणार्‍या व्हिस्कीच्या किमती कमी झाल्यात. त्यामुळे राज्याच्या महसुलात वाढ होईल. सध्या एका दिवसात एक लाख बाटल्या विकल्या जातात. शुल्क कमी केल्यामुळे बाटल्यांची विक्री अडीच लाखांवर पोहचू शकते.
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सरकारला दारूपासून सर्वाधिक महसूल मिळतो. महाराष्ट्रात आयात व्हिस्कीच्या दरात कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारने उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात केली आहे. त्यामुळे व्हिस्कीच्या किमतीत कमालीची घट झाली आहे. आता महाराष्ट्रातील जनतेला कमी किमतीत आयात स्कॉच मिळू शकणार आहे.

Check Also

रिटघर येथे लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सवी वर्ष शुभचिंतन समारंभ उत्साहात

विद्यालयासाठी ४० लाखांची घोषणा पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, थोर देणगीदार, …

Leave a Reply