Breaking News

प्रकाश नायक यांच्याकडून पोलिसांना अल्पोपाहार

अलिबाग : प्रतिनिधी

जनता कर्फ्युच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवहार बंद होते. अशावेली बंदोबस्तासाठी रस्त्यावर फिरणार्‍या पोलिसांसाठी अलिबागेतील स्टार लॉटरी सेंटरचे मालक प्रकाश नायक यांनी पाणी, चहा, नास्ता उपलब्ध करून दिला. या वेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी निशा नायक ही देखील होती. जनता कर्फ्युमध्ये जनता घरात तर पोलीस अधिकारी, कर्मचारी हे बंदोबस्तासाठी रस्त्यावर उन्हात फिरत होते.  आपल्या संरक्षणासाठी फिरणार्‍या पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांना आणि त्यासह इतर कर्मचार्‍यांना चहा, नास्ता देण्याचे प्रकाश नायक यांनी ठरवले. त्यांनी सकाळी आणि संध्याकाळीही पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि तत्सम गरजूंना चहा, नास्ताची सुविधा उपलब्ध करून दिली होती. प्रकाश नायक यांच्या या सेवेबद्दल पोलीस अधिकार्‍यांनीही मनापासून त्यांचे आभारही मानले.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply