Breaking News

‘इनरव्हील’तर्फे ज्येष्ठांसाठी योगाभ्यास कार्यशाळा

पनवेल : रामप्रहर वृत्त

इनरव्हील क्लब ऑफ पनवेलच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी संधिवातावर उपयुक्त ठरणार्‍या योगाभ्यासाची एक तासाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात बुधवारी (दि. 24) सायंकाळी 4 वाजता झालेल्या या कार्यशाळेत ज्येष्ठांचा चांगला प्रतिसाद लाभला. या कार्यशाळेत उपस्थित सदस्यांकडून खुर्चीत बसून सर्व आसने करून घेण्यात आली. सर्व सदस्यांनी फारच उत्साहाने यात सहभाग घेतला व एक तास व्यायामाचा मजेत घालवला. योग सजा नाही तर मजा आहे हे पटवून देण्यात या कार्यशाळेचा नक्कीच उपयोग होईल, असा इनरव्हीलला विश्वास वाटतो. या कार्यशाळेत एकूण 150 ज्येष्ठ नागरिकांनी आणि 20 इनरव्हील सदस्यांनी उपस्थिती लावली व त्याचा लाभ घेतला.

इनरव्हीलकडून या वेळी शिकविल्या गेलेल्या आसनांच्या पुस्तिकांचे वाटपही ज्येष्ठांना करण्यात आले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यात ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जोशी आणि उपाध्यक्षा शामल आंग्रे यांची उपस्थिती महत्त्वाची ठरली. इनरव्हील सदस्य ज्योत्स्ना जोशी, माला दोशी, अलका वैशंपायन, प्रभा सहस्रबुद्धे, शैलजा खाडिलकर आणि योगशिक्षिका गौरी अत्रे यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली. त्याचप्रमाणे प्रेसिडेंट सुलभा निंबाळकर व सेक्रेटरी श्वेता वारिंगे यांनी मोलाचे सहकार्य केले.

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये रक्तदान शिबिर उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी …

Leave a Reply