Breaking News

खालापूर भाजपची आढावा बैठक

खालापूर : प्रतिनिधी

भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आदेशानुसार व जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत खालापूर मंडल अध्यक्ष रामदास ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि. 25) खालापूर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक झाली.

या बैठकीमध्ये भारतीय जनता पक्ष खालापूर शहरात सर्व 17 प्रभागात उमेदवार उभे करून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

या बैठकीत शहर अध्यक्ष राकेश गव्हाणकर, युवा मोर्चा अध्यक्ष प्रसाद पाटील, जिल्हा सरचिटणीस आदिवासी मोर्चा अनंता वाघमारे, लक्ष्मण जाधव, मनोज मिसाळ, छगन मिसाळ, गणेश पारंगे, योगेश जाधव, प्रमोद गव्हाणकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply