पनवेल ः रामप्रहर वृत्त
दर्जेदार शिक्षणासोबतच कला, क्रीडा, सामाजिक क्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी करणार्या व नामवंत अशा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रेरणास्रोत स्व. चांगू काना ठाकूर यांच्या स्मरणार्थ शनिवारी (दि. 11) दुपारी 3.30 वाजता सीकेटी महाविद्यालयातील (स्वायत्त) गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डीएव्ही (मुंबई) महाविद्यालयाचे प्राचार्य व मुंबई विद्यापीठाच्या कॉमर्स अॅण्ड मॅनेजमेंटचे अधिष्ठाता डॉ. अजय भामरे, मुंबई विद्यापीठाचे रजिस्ट्रार सुधीर पुराणिक, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तर प्रमुख मान्यवर म्हणून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, कार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, महापौर डॉ. कविता चौतमोल, संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाचे सदस्य व पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, संतोष शेट्टी, हेमलता म्हात्रे, एकनाथ गायकवाड, सीता पाटील, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, कार्यकारी मंडळ सदस्य संजय भगत व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
Check Also
अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती
भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद …
RamPrahar – The Panvel Daily Paper